आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवारी पहाटे पोलिसांनी पाठलाग करून २ लाख ९९ हजार ६०० रुपयांच्या बनावट खव्याची बोलेरो ताब्यात घेतली. दीड टन बनावट खवा अन्न व औषध प्रशासनाने जप्त करून नष्ट करण्याऐवजी केवळ नमुने घेऊन शीतगृहात ठेवला आहे.
वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी बोलेरोतून खवा जप्त करण्यात अाला. गाडी दुधाळवाडी पाटीवर पाठलाग करून येरमाळा पोलिसांनी पकडली.
कोल्हापूर, सांगली, मिरज भागातून अशा प्रकारे बनावट खव्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून बीड, उस्मानाबाद, येरमाळा, सरमकुंडी येथील काही व्यापारी दररोजच्या चांगल्या खव्यासोबत बनावट खव्याची विक्री करतात. दोन वर्षांपासून अनेकवेळा बनावट खव्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) शि. बा. कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी न. त. मुजावर, नमुना सहायक तुकाराम अकुसकर यांच्या समवेत येरमाळा पोलिस ठाण्यात भेट देऊन तेथे चालक अक्षय सानप याने (क्र. एम. एच. २६ ए. के. २५३५) राजू पाटील (रा.सौंदत्ती कर्नाटक), महेश चौगुले (रा.चंदुर कर्नाटक) यांच्याकडून आणलेला २ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा १ हजार ४९८ किलो खवा जप्त करून रांजणी येथे कोल्ड स्टोरेजमध्ये अहवाल प्राप्त येईपर्यंत ठेवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.