आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उमरगा तालुक्यात महावितरणची एक गाव एक दिवस मोहीम; सव्वासहा कोटींची थकबाकी वसूल

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणने मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून सुरू केलेल्या अनधिकृत वीज तोडणी, थकबाकी वसुली, वीज दुरुस्ती व नवीन जोडणीच्या धडक मोहिमेमुळे थकबाकी वसुलीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. घरगुती, व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहकांकडून मार्च अखेरपर्यंत सहा कोटी २५ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे.

महावितरणची वीज ग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कारवाईतून दररोज एका गावात मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत ५० गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. कुजलेले लोखंडी वीज खांब बदलून नवीन खांब उभारणी, सैल तारांची बांधणी, ३०० रोहित्रांच्या पेट्यातील किटकॅट, केबल बदलणे, रोहित्रांची दुरुस्ती व खांबांची उभारणी झाली. मोहिमेंतर्गत अनधिकृत वीज जोडणी काढण्यात आली तर ६०० नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तालुक्यात घरगुती, व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहकांची ३७,२०० आहे. त्यापैकी मार्चच्या प्रारंभी १७,६०० थकबाकी असलेले ग्राहक होते. त्यांच्याकडे साडेसहा कोटी थकबाकी होती. महावितरणला पाच कोटींचे उद्दिष्ट होते. शासकीय कार्यालय, विविध शाळांकडे ५८ लाख थकबाकी होती. तहसील कार्यालयाने सहा लाखांपैकी एक लाख २९ हजार भरले. शासकीय विश्रामगृहाने तीन पैकी एक लाख भरले. पंचायत समितीने ९८ हजारांपैकी ५० हजार रुपये भरले. ग्रामीण पथदिव्यांचा शासन व पंचायत समितीने ५३ लाखांचा भरणा केला. तालुक्यात शेतीपंपाचे १४ हजार ५०० ग्राहकांकडे ११० कोटी थकबाकी असून त्यापैकी नोव्हेंबर २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत चार कोटी ७५ लाख थकबाकी वसूल करण्यात आली. माफीच्या योजनेचा लाभ घेतलेल्या ६४० ग्राहकांनी सव्वा कोटी रुपये भरले. उद्दिष्टाच्या पाच कोटींपैकी साडेचार कोटी रुपये. पाणीपुरवठा, पथदिव्यांची वसुली असे एकूण सव्वासहा कोटी रुपये वसूल झाले.

ग्राहकांशी थेट संबंध
एक गाव एक दिवस मोहिमेमुळे थेट ग्राहकांशी संबंध आला. त्यांच्या अडचणीही लक्षात आल्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न झाला. कृषी पंपांच्या थकबाकीदारांना सवलतीची योजना होती. मात्र, अल्प प्रतिसाद मिळाला.
- आर. एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता.

बातम्या आणखी आहेत...