आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी परीक्षा:कळंबच्या निवासी मूकबधिर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल ; विद्यालयाचे यश

कळंब9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब या शाळेतील एसएससी बोर्ड परीक्षा मार्चचा शंभर टक्के निकाल लागला.

शाळा २०१५ पासून एसएससी बोर्ड परीक्षेची १०० टक्के निकालाची ७ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करत, ऐकता बोलता येत नसताना आम्ही कोणत्या गोष्टीत कमी नाहीत, हे दाखवून देत, सामान्य मुलांसोबत बोर्ड परीक्षा देत घवघवीत यश प्राप्त केले आहे. एसएससी बोर्ड मार्च २०२२ परीक्षेमध्ये या वर्षी सात विद्यार्थी बसलेले होते. त्या सर्वच मूकबधिर विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये गुण मिळवले आहेत.

यामध्ये खालीलप्रमाणे क्रमांक मिळवले. प्राची प्रमोद होगले, काजल राघू वाघमारे यांनी ८४.२०% घेऊन प्रथम आले आहेत. असिफ मुजीब शेख-७६.६०% घेऊन द्वितीय, वंजारी निरंजन पंडित- ७४.६०% तृतीय, प्रणिता शिवराज बेलुरे ७१.६०%, सुरज रमेश दुधभाते ६५.२०%, गणेश अशोक करवा ६१.२०% टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर व विशेष शिक्षक आश्रुबा कोठावळे तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. हसेगाव केज तालुक्यातील हसेगाव (के) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतून संध्या बंडू गालफाडे ७७.८० टक्के घेऊन प्रथम, प्रसाद चव्हाण ७६.०० टक्के घेऊन द्वितीय तर जया कोल्हे ७५.६० टक्के घेऊन तृतीय आली आहे. विशेष प्रथम श्रेणीमध्ये आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वंभर पाटील, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, सरपंच परीमळा कोल्हे, किरण पाटील व इतरांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...