आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:अनोळखी महिलेच्या कॉलने एक लाखाची फसवणूक

उस्मानाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्डचा दंड कमी करण्याचे आमिष दाखवून येथील समता नगरातील एका व्यक्तिची एक लाख चार हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. माहितीनुसार विवेक डांगे यांना २२ जून रोजी एका अनोळखी महिलेने कॉल करत “तुमच्या क्रेडिट कार्डचा दंड कमी करायचा असून कार्डचा फोटो मला व्हाट्सॲपद्वारे पाठवा.” असे सांगितले. त्यानुसार डांगे यांनी संबंधित महिलेच्या मोबाइल क्रमांकावर क्रेडीट कार्डचा फोटाे पाठवला. त्यावेळी भ्रमणध्वनीवर आलेल्या बँकेच्या संदेशातील ओटीपी त्या कॉल वरील महिलेस सांगताच डांगे यांच्या बँक खात्यातील एक लाख चार हजार १२१ रुपये कपात झाल्याचा संदेश त्यांना आला. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...