आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात एक लाख लसी शिल्लक; 2 लाख 18 हजार लाभार्थींनी अजूनही घेतला नाही पहिला डोस

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर कोरोना लसीकरणात दोन्ही डोसमध्ये अग्रेसर

कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना रांगेत उभे राहून नागरिकांनी लसीकरण करुन घेतले होते. परंतु आता जिल्ह्यात एक लाखाहून अधिक लसी शिल्लक असताना लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील २ लाख १८ हजार ७६७ पात्र लाभार्थींनी पहिला डोस घेतला नसल्याचे स्पष्ट आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाला लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर या दोनच गटातील लाभार्थी दोन्ही डोस घेण्यात अग्रेसर आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू आहे. मात्र, कोरोना ओसरल्यानंतर नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. पाच मे पर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी तसेच ४५ ते ५९ आणि ६० वर्षे पेक्षा जास्त वयाची लाभार्थी संख्या १३ लाख ९५०० इतकी आहे. त्यापैकी पहिला डोस १० लाख ९० हजार ७३३ जणांनी तर या पैकी ८ लाख ५ हजार लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. यातही आरोग्य कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोसचे प्रमाण ९९.२६ टक्के आहे. फ्रंटलाइन वर्करचे प्रमाण १५८.१९ टक्के इतके आहे. नव्याने तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणात पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचा अधिक जास्त समावेश आहे. दुसरीकडे अगोदर सुरु करण्यात आलेल्या तरुणांच्या १५ ते १७ वर्षे वयोगटातील लसीकरण ६४.२० टक्के इतकेच झाले आहे.

बुस्टर डोस घेण्यात आरोग्य कर्मचारी पुढे
दोन्ही डोस देऊनही तिसरा बुस्टर डोस देण्यात येत आहेत. यात ज्यांचे पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस झाले आहेत, त्यांना तिसरा म्हणजे बुस्टर डोस देण्यात येत आहेत. त्यात आरोग्य कर्मचारी, अधिकारी पुढे असून त्यांचे प्रमाण २८.७८ टक्के इतके आहे. दुसरीकडे फ्रंटलाइन वर्करचे १४.५६ टक्के इतके प्रमाण आहे. यात ६० वर्षापेक्षा अधिक तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक २९.१९ टक्के इतके असल्याचे दिसून येते.

लसीकरण कमीच, प्रशासनाचा लागणार कस
दोन वयोगटातील लाभार्थी सोडल्यास अन्य सर्वच वयोगटातील पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या कमीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाचा लसीकरण करुन घेण्यासाठी अधिक कस लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...