आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील दोघे जण दुचाकी क्रमांक (एमएच २५ एक्स ०९५०) वरुन कलबुर्गी-लातूर मार्गावरुन जात होते. त्यावेळी पाठीमागून येणारी कारने क्रमांक (डीएल ३ सीसीएन ०३३६) बाबळसूर पाटीजवळ दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही घटना मंगळवारी (दि.२२) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बावळसूर पाटीजवळ घडली.

यात दुचाकीवरील धनराज मोरे (७०) रा. नागराळ (मुर्शदपूर ता. लोहारा) यांचा मृत्यू झाला. तसेच शिवाजी बलसुरे (४१, रा. नागराळ, लोहारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच श्री नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून उमरगा शहरातील खासगी रुग्णालयात जखमीला दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांत रात्रीपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...