आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान:प्रत्येक प्रभागात एक जागा सर्व साधारण; तुळजापुरात प्रभागात पती किंवा पत्नी निश्चित असल्याने इच्छुकांमध्ये समाधान

तुळजापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी साठी सोमवार (दि. १३) प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी ओबीसी आरक्षण वगळून निवडणूका होत असल्याने यावेळी केवळ अनुसूचित जाती महिलांचा दोन जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी प्रत्येक प्रभागात एक जागा सर्व साधारण किंवा सर्व साधारण महिलांना साठी सुटली असल्याने सर्व इच्छुकांत समाधानाचे वातावरण आहे.

तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी अरविंद नातू यांची उपस्थिती होती. या प्रक्रियेत पालिकेचे निवडणूक विभाग प्रमुख रणजित कांबळे, लिपिक महादेव सोनार यांनी सहाय्य केले. प्रारंभी लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक २, ५, ६ आणि ८ या ४ प्रभागातील ४ जागा पैंकी २ जागांची महिलांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या मध्ये प्रभाग क्रमांक २ आणि प्रभाग क्रमांक ८ मधील प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती महिला साठी राखीव सोडण्यात आली. यावेळी नगर पालिका शाळा क्रमांक ३ मधील मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रियेचे व्ही डी ओ चित्रण करण्यात आले. या आरक्षण सोडत कार्यक्रमाला शहरातील सर्व च राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.

१२ जागा महिलांसाठी राखीव
यावेळी एकूण ११ प्रभाग असून प्रभाग क्रमांक १ ते १० प्रत्येक प्रभागात २ उमेदवार तर ११ व्या प्रभागातून ३ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यामध्ये १२ जागा महिलांसाठी राखीव असतील पैकी २ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर एकूण ०९ जागा सर्व साधारण व १० जागा सर्व साधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता निवडणुकांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...