आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूम तालुक्यातील जयवंतनगर येथील प्रतिष्ठेची झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत कै प्रल्हाद मारुती नागरगोजे यांच्या पॅनलचे १३ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहेत. मागील ग्रामपंचायत अटीतटीची लढतीत सात उमेदवारांमध्ये चार तीन अशी लढत झाली होती ग्रामपंचायत फक्त सहा मतामुळे ग्रामपंचायत मध्ये पराभव झाला होता.
त्यामुळे सोसायटी निवडणूक चुरशीची होणार असे बोलले जात होते तर सोसायटीमधील १३ पैकी दोन जागा दोन जागा इतर मागासवर्गीय प्रतिनिधी व अनुसूचित जाती जमाती यांचे सभासद नसल्यामुळे रिक्त राहिल्या. त्यामुळे जयवंतनगर ची सेवा सोसायटी निवडणूक तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनली होती. सोसायटी स्थापनेपासून प्रल्हाद नागरगोजे यांनी सोसायटीवर वर्चस्व ठेवले होते.
एक वेळेस चा अपवाद वगळता प्रत्येक वेळेस सोसायटी निवडणूक बिनविरोध होती. परंतु दुसऱ्या पॅनलच्या प्रमुख कडून सोसायटी मतदार यादीतील सत्तर नावावर आक्षेप घेत ७० मतदान वगळण्याच्या संदर्भात जिल्हा सहाय्यक निबंधक संस्था यांच्याकडे अपिल केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयवंतनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या ७६ सदस्यांची नावे प्रारूप मतदार यादी मधुन वगळण्याच्या निर्णयाच्या विरोधात जयवंतनगर सोसायटीच्या ७० सदस्यांनी ॲड. किशोर आर.डोके यांच्या मार्फत, उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. औरंगाबाद उच्च न्यायालयाने दोन्हीं बाजूंचा तसेच सरकार पक्षाचा आणि जिल्हा निबंधक यांचे वकिलांचा युक्तिवाद ऐकून ७० सदस्यांची नावे बेकायदेशीर पद्धतीने वगळण्यात आल्याबाबतचा, वादी चे वकील ॲड. डोके यांचा युक्तिवाद मान्य केला आणि जिल्हा निबंधक यांना त्या ७० सदस्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर झालेल्या सोसायटी मतदानामध्ये सुरेखा प्रल्हाद नागरगोजे नागरगोजे, आशाबाई नागरगोजे, कविता नागरगोजे, सोपान नागरगोजे, सदाशिव नागरगोजे ,शंकर नागरगोजे, सुनिता नागरगोजे, नवनाथ नागरगोजे, महादेवी नागरजोगे हे सर्व उमेदवार ६० पेक्षा अधिक मताने विजयी झाले. अॅड. रवींद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मधील भ्रष्टाचार हटाव पॅनेलचा दारुण पराभव झाला.
प्रल्हाद नागरगोजे यांच्या पॅनलच्या विजयासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव नागरगोजे, पुणे येथील युवा उद्योजक तुकाराम शेट नागरगोजे, प्रवीण नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य विनोद नागरगोजे, वसुदेव नागरगोजे, शिवाजी नागरगोजे, सोपान नागरगोजे, भीमराव नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.