आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:36 गावांमध्ये एक गाव एक गणपती; मोरया कळंब, शिराढोण,येरमाळा पोलिस ठाण्यांतर्गत मूर्तींची स्थापना

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कळंब, शिराढोण, येरमाळा पोलीस ठाणे अंतर्गत अनेक गावांमधील गावकऱ्यांनी एकत्र येत ३६ गावात एक गाव एक गणपती च्या मुर्ती ची स्थापना करण्यात आली, तर कळंब शहरात विविध गणेश मंडळांनी २२ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. गणेश उत्सव हा सर्वांचा आवडता उत्सव आहे, प्रत्येक गणेश मंडळातील सदस्य हे अहोरात्र काम करुन गणेश उत्सव चांगल्या पध्दतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतात. गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. तालुक्यातील घरोघरी तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये अकरा दिवसांसाठी बाप्पाची स्थापना होते. तालुक्यातील कळंब, शिराढोण व येरमाळा पोलीस ठाण्य अंतर्गत मोठ्या प्रमाणात गणेश मुर्ती ची स्थापना करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब चे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि दिनकर गोरे,पोलीस ठाण्याचे सपोनि वैभव नेटके व पोलीस कर्मचारी अहोरात्र गणेश मंडळावर लक्ष ठेवून आहेत.

उत्सवावरील बहुतांशी निर्बंध उठवल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात होत असताना अजूनही अनेक गावांनी पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम ठेवला आहे. याचाच एक भाग म्हणून ३६ गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. तर ६५ गावात गणेश मंडळांनी १८० गणेश मुर्ती ची स्थापना केली आहे.

कळंब पोलीस ठाण्यात एकुण २६ गावे आणि कळंब शहर येते. शहरात २२ गणेश मुर्ती ची स्थापना करण्यात आली आहे. तर तीन गावात एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आली, उर्वरित २३ गावात ३४ गणेश मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. शिराढोण पोलीस ठाणे अंतर्गत ३९ गावे येतात. यामध्ये १७ गावात एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आली आहे. तर उर्वरित २२ गावात ७४ गणेश मुर्ती ची स्थापना करण्यात आली आहे.येरमाळा पोलीस ठाणे अंतर्गत ३६ गावे येतात, या मध्ये १६ गावात एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आली आहे. तर उर्वरित २० गावात ५० गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...