आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकटीवाडीत शैक्षणिक:6 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ; सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील घाकटीवाडी येथील युवकांनी सहा वर्षांपासून इको फ्रेंडलीसह ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना जोपासली आहे. गणेशोत्सवात रायण्णा बोकले, श्रीनाथ चेंडकापुरे, अतुल घोटाळे, साहेबा सास्तुरे, प्रमोद बोकले, विक्रम चेंडकापुरे, सागर सास्तुरे, सुनिल व्हन्नाळे आदी युवक विधायक उपक्रम राबवत आहेत. यावर्षी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातून उत्सव साजरा करत आहेत. श्री विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने लेझीम, टिपरी व झांजपथकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. श्री पूजेला येणाऱ्या व्यक्तीने दानपेटीत पैसे न टाकता त्यात शैक्षणिक साहित्य टाकण्यास सांगितले. ते साहित्य संकलित करुन अनाथ, निराधार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. गणेश मंडळांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर धाकटीवाडी गावाने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवून इतरांनाही संदेश दिला आहे. एक गाव एक गणपतीची संकल्पना प्रत्यक्षात रुजवून समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून, गावकऱ्यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सामान्य ज्ञान स्पर्धा
बेडर कन्हय्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने रविवारी (दि. ४) आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जयवंत मोरे, मंडळाचे अध्यक्ष रायाण्णा बोकले, उपाध्यक्ष श्रीनाथ चेंडकापुरे, पोलिसपाटील व त्यांचे सहकारी सुनील व्हन्नाळे, स्वप्निल सास्तूरे, प्रमोद बोकले, व्यंकट बोकले, अतुल घोटाळे, विजय सास्तूरे, तानाजी चेंडकापुरे, दौलाप्पा घोटाळे, माणिक व्हन्नाळे, प्रद्युम सीताळगिरे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...