आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जागतिक घडामोडींबाबत ऑनलाइन मार्गदर्शन ; ​​​​​​​ लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात परिषद

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात समकालीन जागतिक घडामोडी : भारतापुढील संधी, समस्या आणि आव्हाने या विषयावर राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.३१) आंतर विद्याशाखीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर होते. औरंगाबाद स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक सदस्य आणि देवगिरी डिफेन्स अकॅडमीचे सल्लागार या पदावर कार्यरत असणारे लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ‘समकालीन जागतिक घडामोडी : भारतासमोरील संधी, समस्या आणि आव्हाने’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून भारताची ताकद, कमजोरी यावर लक्ष वेधून भारताला असणाऱ्या संधी, तसेच महासत्ता म्हणून भारताची असणारी वाटचाल, त्यात असणारे अडथळे यावर ढगे यांनी प्रकाश टाकला. तसेच सशक्त भारत घडवण्यासाठी तरुणांचे व राज्यकर्त्यांच्या धोरणांचे मोठे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन केले. प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड येथील प्रा. डॉ. राजेश चालिकवार यांनी ‘आशिया खंडातील समकालीन घडामोडींच्या संदर्भात भारतापुढे असणाऱ्या समस्या व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. कर्नाटक येथील सरकारी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक एम. एस. योगेश यांनी ‘कोरोना महामारी काळातील शिक्षण व्यवस्थेची जागतिक स्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...