आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्यमहोत्सव ; मेळाव्यास प्रतिसाद

उमरगा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गटशिक्षण कार्यालयाकडून आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव, विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता.तालुका गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन व शरणप्पा मलंग विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव, विज्ञान शैक्षणिक साहित्य प्रदर्शन घेण्यात आले होते. राष्ट्रीय विज्ञान मेळाव्याचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांचे हस्ते झाले.

यावेळी बोलताना श्री बिराजदार म्हणाले की, स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे. विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती, शिक्षकांची मिळालेल्या प्रेरणेतून जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी नक्की राज्यस्तरापर्यंत पोहंचण्यास मदत होईल. ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनासाठी प्रशिक्षक म्हणून प्रा डॉ उदय दिंडोरे, विजपुरे, तांत्रिक सहाय्य प्रभाकर पांचाळ, बळीराम घोरवडे यांनी काम पाहिले. यावेळी विज्ञान स्पर्धा मार्गदर्शक पार्वती माशाळकर, डॉ रवी आळंगे, विषय तज्ञ रमेश मंमाळे, विज्ञान शिक्षक अजित साळुंके उपस्थित होते.

तालुकास्तरीय स्पर्धेत यांनी मिळविले यश
तालुकास्तरीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव व विज्ञान मेळावा यातील विजयी स्पर्धकांची नावे : विज्ञान प्रदर्शन उच्च प्राथमिक गटातून प्रथम भारत विद्यालय उमरगा, द्वितीय जिल्हा परिषद शाळा कुन्हाळी, तृतीय जिल्हा परिषद शाळा हंद्राळ.माध्यमिक गटात जिल्हा परिषद प्रशाला मुरूम प्रथम, कै शरणप्पा मलंग विद्यालय द्वितीय तर श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय तृतीय.

राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धेत डॉ. के. डी शेंडगे इंग्लिश स्कूल प्रथम, शरणप्पा मलंग विद्यालय द्वितीय तर जिल्हा परिषद शाळा चिंचोली जहागीर तृतीय.
अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात शरणप्पा मलंग विद्यालय प्रथम व श्री शिवशक्ती विद्यालय एकुरगा द्वितीय. शैक्षणिक साहित्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या श्रीमती पुष्पलता पांढरे प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाळिंब श्रीमती सुनिता पोतदार द्वितीय आले असल्याने सर्वच विजयी स्पर्धकांचे गटशिक्षण कार्यालयाकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे
विद्यार्थ्यात जिज्ञासावृत्ती निर्माण होण्यासाठी आवश्यक असतानाच संस्कृतीचे जतन करताना नैतिकमूल्य,आरोग्य आणि मैदानी स्पर्धेत विद्यार्थी पुढे येऊन स्पर्धेत टिकण्यास शिक्षकांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बिराजदार यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...