आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद पेटंट हा आपण केलेल्या संशोधनाचाच हक्क असून संशोधन कर्त्याचा हक्क पेटेंट द्वारे अबाधित ठेवला जातो. याचा कालावधी मर्यादित स्वरूपात असून या बौद्धिक संपदा हक्काचा जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा याद्वारे आपला हक्क तर अबाधित राहतोच पण यामुळे याचा होणारा गैरवापर सुद्धा आपल्या हक्कामुळे टाळता येतो. याच्यासाठी प्राथमिक कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे याविषयावर हिमांशू चंद्राकर सविस्तर बोलत होते. येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेल्लेक्च्युअल प्रोपर्टी मॅनेजमेंट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया या दोघांच्या संयुक्त विद्यमाने "ऑनलाईन वर्कशॉप ऑन इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राइट्स " या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन वर्कशॉपचे आयोजन केले होते .यावेळी हिमांशू चंद्रकार (पेटंट अँड डिझाईन परीक्षक ,नागपूर)बोलत होते.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, आपण भौतिक गोष्टींनाच संपत्ती मानतो. परंतु आपल्याकडे सर्वात महत्त्वाची आपली बौद्धिक संपत्ती असून याचा सुनियोजित पद्धतीने वापर करून आपण त्याचे पेटंट जेव्हा घेतो, तेव्हा निश्चितच याचा फायदा आपल्याला तर होतोच. पण यामधून देशाच्या प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करतो.यामुळे विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांनी बौद्धिक संपदा हक्क याविषयी जागरूक राहून आपल्या कुवतीप्रमाणे यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करावा. देशातील तरूणंामध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना डॉ. माने पुढे म्हणाले की, आमच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच इलेक्ट्रिक स्कूटर ,ऑटोमॅटिक सॅनिटायझेशन करणारा रोबोट इत्यादी विषयात संशोधन केले असून भविष्यात यावरील पेटंट मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. या कार्यक्रमाचे समन्वयक आणि रिसर्च डीन डॉ.सुशीलकुमार होळंबे यांनी या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एकूण ४३७ विद्यार्थी प्राध्यापक ,आणि संशोधन करणारे सहभागी झाले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.