आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवाची तयारी:दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच मिळेल तुळजाभवानी मातेचे दर्शन, तुळजापुरात दर्शन मंडपाचे काम अंतिम टप्प्यात

तुळजापूर (प्रदीप अमृतराव)14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रात खबरदारी म्हणून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येईल. सॅनिटायझेशन तसेच थर्मल स्क्रीनिंग करूनच दर्शन रांगेत सोडण्यात येणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील दोन दर्शन मंडप उभारण्यात येत आहेत. एका मंडपाचे काम पूर्ण झाले असून, दुसरा मंडप दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे भाविकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक प्रयत्न करणार आहेत. या काळात अधिकाऱ्यांसह तब्बल २१०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असून, लसींचे दोन्ही डोस झालेले कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येतील.

नवरात्रात भाविकांना घाटशीळ रोड वाहनतळ मार्गे मंदिरात सोडण्यात येणार आहे. यासाठी घाटशीळ रोड वाहनतळ येथे भव्य वाॅटरप्रूफ दर्शन मंडपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव गुरुवारपासून (दि.७) घटस्थापनेने सुरू होत आहे. राज्य सरकारने घटस्थापनेपासून धार्मिक स्थळे खुली करण्याचे निर्देश दिले असून, कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खबरदारी घेत आहे.

प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग होणार
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. विशेषतः परजिल्हा तसेच परराज्यातील भाविकांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवेशद्वारावरच सॅनिटायझेशन व थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. मास्क बंधनकारक असणार आहे.

अभिषेक रांगा नसणार
एका दर्शन मंडपात धर्म दर्शनाची सुविधा असणार, तर दुसऱ्या दर्शन मंडपात मुख दर्शन आणि सशुल्क दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घाटशीळ रोड वाहनतळ येथे मोठ्या संख्येने दर्शन पास काउंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवरात्रात कुलाचार पूजा करण्यावर निर्बंध असल्याने अभिषेक रांगा नसणार आहेत.
दोन भव्य वाॅटरप्रूफ दर्शन मंडप

भवानी कुंड बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी खबरदारी म्हणून भवानी कुंड बंद असणार आहे. भवानी कुंडात एकाच वेळी शेकडो भाविकांच्या स्नानाची सोय होती. मात्र, भवानी कुंड बंद असल्याने या वर्षी भाविकांना स्नानासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

डिस्टन्सिंग, मास्कची खबरदारी घेणार
२१०० पोलिस, अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड अशी नवरात्र महोत्सवाच्या बंदोबस्ताची तयारी असून, सर्वांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. सॅनिटायझेशन, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...