आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:सावरगावात खुलेआम अवैध पेट्रोल, डिझेलची विक्री ; नागरिकांचा जीव धोक्यात

तामलवाडी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे अवैध पेट्रोल-डिझेलची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गावात खुलेआमपणे अवैध धंदे जोरात सुरु असुन भर चौकात दिवसाढवळ्या पेट्रोल, डिझेल विक्री केली जात आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

हे गाव अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बनले असुन गावातील पानटपरी, हॉटेल, किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटख्याची विक्री केली जात आहे. तर दोन ठिकाणी गांजाची विक्री केली जात आहे. गावात अनेक ठिकाणी देशी-विदेशी दारूची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अनेकांच्या घरांची राखरांगोळी होत आहे. तरी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.मोठ्या शहरांमध्ये लोकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समुपदेशनाचे अनेक कार्यक्रम जसे होतात, तसे उपक्रम येथेही राबवावेत, अशी मागणी नागरिकिांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...