आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशाची संधी:आयटीआयच्या 130 जागांसाठी संधी

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय आयटीआयच्या पाच ट्रेडमधील १३० जागांसाठी दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कारपेंटर, बेसिक कॉस्मेटोलॉजी, सेक्रेटरी प्रॅक्टिस, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग व बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अभ्यासक्रमासाठी जागा रिक्त आहेत.

इच्छुक उमेदवारांनी नव्याने फॉर्म भरून संपर्काचेे आवाहन प्राचार्य एस. बी. वाघमारे व गटनिर्देशक डी. बी. जाधव यांनी केले. कारपेंटर २२, बेसिक कॉस्मेटोलॉजी ३५, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग २४, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन २४, सेक्रेटरी प्रॅक्टिस २२ आदी ट्रेडच्या जागा रिक्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...