आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूम तालुक्यातील गिरवली येथे “सार्वजनिक स्मशानभुमी “साठी सरकारी जमिन सर्व्हे नंबर ६ मधील वीस गुंठे जमिन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. याबाबत अधिक माहिती अशी की, दैनिक दिव्य मराठीने दि.२३ नोव्हेंबर रोजी “२५ वर्ष आमदार लाभलेल्या गिरवलीत स्मशानभूमीच नाही “ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच मतदारसंघाचे आमदार राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी तात्काळ दखल घेत दि.२७ नोव्हेंबर रोजी जिल्हाअधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना गिरवली येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून स्मशानभूमी मंजूर करण्याबाबत लेखी पत्राद्वारे आदेश दिले होते.
आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या पत्राची जिल्हाअधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दखल घेऊन गिरवली येथील सरकारी जमिन सर्व्हे नंबर ६ मधील ०.४१ हेक्टर आर पैकी ०.२०हेक्टर आर क्षेत्र जमिन ही “ सार्वजनिक स्मशानभूमी “ वापरासाठी विहीत अटी व शर्तीवर मंजूर केली आहे. गिरवली येथील स्मशानभूमीचा विषय केवळ पंधरा दिवसात मार्गी लागल्याने आरोग्य मंत्री तानाजी सावंत याचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील गिरवली याठिकाणी स्मशानभूमी नाही.त्यामूळे याठिकाणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यृ झाला तर त्यावर अत्यसंस्कार करण्यासाठी येथील नागरिकाना अनेक अडचणीचा समाना करावा लागत आहे.तर पावसाळ्यात सर्वात मोठी कसरत येथील नागरिकाना करावी लागते.यामुळे येथिल नागरिकाना अत्यसंस्कार करण्यासाठी वन विभागाच्या गायरान व पडीक असलेल्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. दै.” दिव्य मराठीतील यासंदर्भातील बातमीमुळे खळबळ माजली होती.
लोकप्रतिनिधी राहिलेल्या गावातच अशी अवस्था तर बाकी गावाची काय स्थीती असणार अशी मोठी चर्चा नागरिका मध्ये दिसून आली.या बातमी नंतर शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार व आरोग्य मंत्री प्रा.डाॅ.आ.तानाजी सावत हे परंडा दौऱ्यावर आले असता त्यानी याची दखल घेऊन जिल्हाधिकारी याना पत्र व्यवहार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.