आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकायचे कोणाचे:कळंबमध्ये वैद्यकीय अधीक्षकाच्या पदभाराचे 24 तासांत दोघांना आदेश ; आरोग्य सेवेचा दर्जा सुधारला

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या निवृत्तीनंतर डॉ. पुरुषोत्तम पाटील यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार द्यावा, असा आदेश ३१ मे रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढला होता. मात्र, १ जून रोजी उपसंचालक लातूर यांच्या आदेशान्वये डॉ. मंजुराणी शेळके यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा, असा आदेश काढण्यात आला आहे. अतिरिक्त पदभाराचे २४ तासात दोन आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त होत असून आरोग्य विभागाचे कामकाज कोणाच्या इशाऱ्यावर चालते असा प्रश्न सामान्यांना निर्माण होत आहे. कळंब शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हे रेफर रुग्णालय झाले होते. वैद्यकीय अधीक्षक म्हणून २०१६ ला डॉ. जीवन वायदंडे यांची उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती झाली होती. त्यांनी रुग्णालयाचा कायापालट करत परिसरात बाग तयार केली. वाचनालय केले. स्वच्छता ठेवत अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्याच बरोबर प्रसूती ऑपरेशन जास्तीत जास्त केले. कोरोना काळात डॉ. वायदंडे यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसोबत योग्य नियोजन केले होते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले होते. कोरोना काळात डॉ. वायदंडे सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यांना मुदत वाढ मिळाली होती. १ जून रोजी डॉ. जीवन वायदंडे यांचा कार्यकाळ संपला आहे. सध्या वैद्यकीय अधीक्षक या पदावर कायम स्वरूपी अधिकारी नसल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार डॉ. पुरुषोत्तम पाटील यांना देण्यात आल्याचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी ३१ मे रोजी काढले होते. मात्र, १ जून रोजी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर यांच्या संदर्भित आदेशान्वये उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील वैद्यकीय अधीक्षक (आहरण व सवितरण) पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. मंजुराणी उद्धवराव शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावा, असे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी काढले आहे.

३१ मे रोजी डॉ. पुरुषोत्तम पाटील यांना वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा असे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काढले होते. असे असताना १ जून रोजी उपसंचालक लातूर यांच्या आदेशान्वये डॉ. मंजुराणी शेळके यांना वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. २४ तासाच्या आता दोन जणांच्या पदभाराचे पत्र देण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. मंजुराणी शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण झाली असून डॉ. शेळके कामचुकार कर्मचाऱ्याला अंकुश घालतील का? हे पुढील काळात समजणार आहे.

बातम्या आणखी आहेत...