आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना न्याय:विमा देण्याचा आदेश, तेरमध्ये जल्लोष ; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप हंगामातील पीकविमा देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला दिला आहे. याप्रकरणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्यामुळे तेर येथे शेतकरी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळून व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. बजाज अलायन्झ कंपनीने २०२० मधील खरीप हंगामात ७२ तासांच्या आता पीक नुकसानीची माहिती ऑनलाइन दिली नाही म्हणून विमा रक्कम नाकारली होती. याप्रकरणी सोमवारी (दि.५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आमदार राणा पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेर येथे सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, बबलू मोमीन, पद्माकर फंड, हरी नाईकवाडी, भास्कर माळी, विठ्ठल लामतुरे, गणेश फंड, पोपट नाईकवाडी, मंगेश फंड, अतीश फंड, अनिल टेळे, खंडू कानडे, प्रसाद राऊत यांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी गोड होईल, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...