आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:16 जागांवर सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण आरक्षण जाहीर; तहसील कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम

भूम18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन झालेल्या दहा प्रभाग रचनेच्या २० जागेसाठी ओबीसी प्रवर्ग वगळून प्रथमच सोमवार दि. १३ रोजी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे व नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये ३ जागा अनुसूचित जातीसाठी त्यातील २ जागा महिलांसाठी आरक्षित असून १ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत तर १६ जागेवर सर्वसाधरण महिला व सर्वसाधारण आरक्षण जाहिर झाले. यावेळी लहान विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहिर करण्यात आले.

असे आहे एकूण दहा प्रभागाचे आरक्षण
प्रभाग क्रमांक - १) अ - अनुसूचित जाती ब - सर्वसाधारण महिला , प्रभाग क्रमांक - २) अ - अनुसूचित जाती महिला , ब - सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक - ३) अ -अनुसूचित जाती महिला,ब - सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक - ४) अ - सर्वसाधारण महिला ब - सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक - ५) अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक - ६) अ - सर्वसाधारण महिला,ब - सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक - ७) अ - सर्वसाधारण महिला , ब - सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक - ८) अ - सर्वसाधारण महिला ब - सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक - ९) अ - सर्वसाधारण महिला,ब - सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक -१० ) अ - अनुसूचित जमाती, ब - सर्वसाधारण महिला

यावेळी नगरअभियंता गणेश जगदाळे, टी . के. माळी, महसूलचे आश्विनकुमार कांबळे, कमलाकर पेंटर, जाधव यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...