आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:41किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन; एक लाखांचे बक्षीस

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती येथे आठ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेसहा वाजता मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. रत्नमाला चौक वरोरा ते पडोली चौक चंद्रपूर या मार्गावर ही स्पर्धा पार पडणार आहे.

यासाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये व ट्रॉफी असणार आहे. तसेच द्वितीय ५१ हजार रुपयांचे तर तृतीय ३१ हजार रुपये, चतुर्थ २१ हजार व पाचवे बक्षीस ११ हजार रुपये व ट्रॉफी असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील धावनपटुंनी यात सहभागी होण्याचे आवाहन खासदार बालुभाऊ ऊर्फ सुरेश धानोरकर, चंद्रपूर वर्णी-आर्णी व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे. यासाठी गोविल मेहरकुरे, व सौरभ बनकर यांना संपर्क साधण्याचेही त्यांनी आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...