आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक अहवालाचे वाचन:पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३ व्या अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत साखरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२०) बालाजी मंदिर मारवाडी गल्ली, उस्मानाबाद येथे उत्साहात पार पडली.या वेळी अध्यक्ष श्रीकांत साखरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यांनी सभासद भाग, भाग भांडवल, गंगाजळी व इतर निधी तसेच दरवर्षी ठेवी समाधानकारक वाढ होत असल्याचे सांगून संस्थेचे भाग भांडवलाची माहिती सांगितली.

तसेच संस्थेच्या सभासदांना ९ टक्क्या प्रमाणे लाभांश जाहीर केला. यावेळी जिल्हा सहकार विकासाधािकारी मधुकर जाधव यांनी ठेवी, कर्ज व कर्जवसुलीबाबत मार्गदर्शन केले. सभेस संचालक शेषराव जगताप, सुधाकर झोरी, गणपत रोडे, लता अग्रे, अर्जुन साखरे, सुरेखा साखरे, कायदेशीर सल्लागार अॅड. विनायक नाईकवाडी, रवींद्र पाटील आदी सभासद उपस्थित होते.

सूत्रसंचालन व्यवस्थापक एन. बी. बचाटे व आभार एच. टी. महाळगकर यांनी मानले. सभेचे कामकाज पाहण्यासाठी संस्था कर्मचारी देवकते, योगेश भोसले, सुलक्षणा माने, ओंकार जगताप, शाम साखरे, जितेंद्र झाडे, चंद्रकांत इंगळे, दिलीप अडसूळ, हरीभाऊ उंबरे, महेंद्र उंबरे, बालाजी सूर्यवंशी, नितीन जामगे, श्रीधर पाटील यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...