आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षरता दिन साजरा:संगणक साक्षरतादिनी कार्यक्रमाचे आयोजन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाच्या वतीने जागतिक संगणक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. व्ही. पवार, गणित विभागप्रमुख डॉ. व्ही. एम. गायकवाड, संगणक शास्त्र विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत रेवते यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. पवार म्हणाले की, पुरेसे संगणक न पोहोचलेल्या व तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता आणण्यासाठी जागतिक संगणक साक्षरता दिन सुरू झाला. संगणकाविषयी जागरुकता पोहोचवण्याचा मार्ग म्हणजेच सोशल मीडिया. त्याचबरोबर माध्यमांमधून संगणका विषयी माहिती दिल्यास त्यासंबंधीचे फायदे लोकांपर्यंत पोहोचतील व मदत होईल. तसेच जागरुकताही येणार आहे.

यावेळी डॉ. रेवते म्हणाले, जागतिक संगणक साक्षरता दिनाला यावर्षी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. संगणक तंत्रज्ञानाविषयी डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी दोन डिसेंबर रोजी संगणक दिन पाळला जातो.

यावेळी डॉ. भरत शेळके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. व्ही. व्ही. जाने यांनी प्रास्ताविक केले. पी. आर. जाधव, आर. एम. शिंदे यांनी संगणक साक्षरतेचे महत्व विशद केले. यावेळी प्रा. आर. आर. नितनवरे, प्रा. वर्षा होटगे, प्रा. एस. जी. बनसोडे, प्रा. कादरी, प्रा. स्वाती मुगळे, डॉ. एम. निर्मळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...