आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही दिन:विभागीय लोकशाही दिनाचे 13‎ फेब्रुवारी रोजी आयोजन‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीयस्तरावरील लोकशाही दिनाचे‎ फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक १३‎ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी विभागीय आयुक्त‎ कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच‎ नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर‎ विभागीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात‎ आला आहे.तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित‎ मुदतीत नमुना प्रप्रत्र-१ (क) मध्ये दोन प्रतीत‎ आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त‎ कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब‎ तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहे.‎

विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-१ (क) आवक शाखेत‎ उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय‎ महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत‎ नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त,‎ महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा‎ सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या‎ दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी‎ विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर‎ कराव्यात.

तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय‎ स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले‎ असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही‎ झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता‎ येणार नाही. अनुत्तरित असे सर्व प्रश्न विभागीय‎ स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहे,‎ असे कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...