आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:केमवाडीत आरोग्य शिबिराचे आयोजन ; 100 नागरिकांनी नोंदवला सहभाग

तामलवाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे बुधवारी (दि.२) इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी, श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक बार्शी व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय केमवाडी यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये एकूण १०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये रक्त गट तपासणी, हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.आवश्यक रुग्णांना गोळ्या देण्यात आल्या.डॉ. दिलीप कराड यांनी सी. पी. आर. चे ट्रेनिंग देऊन प्रात्याक्षिक करून दाखवले. यामध्ये गावातील महिलांचा सहभाग होता. या शिबिरात डॉ. दिलीप कराड सेक्रेटरी रामभाई शहा ब्लड बँक बार्शी, वैभव कुलकर्णी लॅब टेक्निशियन, विशाल घोळवे लॅब टेक्निशयन, सरपंच राजेंद्र डोलारे, उपसरपंच गौरीशंकर नकाते, निशांत फंड, आशा काशीद, अंजना ताटे, विशाल फंड, तसेच गावातील ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...