आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:तेरमध्ये कीर्तनरूपी सेवेचे आयोजन‎

तेर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज घडविण्यासाठी आज‎ महाराष्ट्रातातील वारकरी संप्रदाय‎ अहोरात्र झटत आहे.आपल्या‎ समाज प्रबोधनातून साधू संत‎ स्वतःला काही मागत नाहीत तर‎ समाजासाठी देवाकडे मागणे‎ मागतात असे प्रतिपादन‎ किर्तनकेसरी ह.भ.प.अक्रूर महाराज‎ साखरे यांनी केले.‎ धाराशिव तालुक्यातील तेर येथे‎ वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण‎ संस्थेचे संस्थापक ह.भ.प.रघुनंदन‎ महाराज पुजारी यांच्या संस्थेतील‎ आजी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता‎ सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या‎ कीर्तनरूपी सेवेत साखरे महाराज‎ बोलत होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎साधू संत देवाला मागणी‎ मागायला मंदिरात जात नाहीत.‎

भक्तीच्या जोरावर देवच आपल्या‎ घरी बोलाविण्याची ताकद संतामध्ये‎ आहे,असेही विचार त्यांनी आपल्या‎ निरूपणात मांडले.‎ यावेळी ह.भ.प.रघुनंदन महाराज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पुजारी यांचा आजी माजी‎ विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ पुष्पहार‎ घालून सत्कार केला. यावेळी‎ अरूण महाराज कदम,गोविंद‎ महाराज पांगरकर धनंजय पुजारी‎ यांच्यासह विविध संस्थांचे‎ पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...