आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात शुक्रवारी (दि ३) पालक मेळावा व जागतिक वन्यजीव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवशक्ती विद्यालयातील नववी मधून दहावीमध्ये प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे होते. यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कुंभार उपस्थित होते. पालक सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये वासंतिक वर्ग, इयत्ता दहावी पुढील वर्षभराचे नियोजन, शंभर टक्के वासंतिक वर्गासाठी उपस्थिती, ४० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे, वर्ग तीन मार्च ते दहा मे या कालावधीत घेणे, उन्हाळ्यात सुट्टीत अभ्यास नियोजन, गृहकार्याचे वेळापत्रक, घर, शेतीतील इतर कामे कमी करून अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ देणे, शैक्षणिक साहित्य उपलब्धता, पालकांनी किमान १५ दिवसातून एकदा शाळेत येऊन सर्व शिक्षकांच्या भेटी घेऊन पाल्याच्या प्रगती विषयी चर्चा करावी हे विषय मांडण्यात आले.
यावेळी महेश लिंबाळे, मुरशद अफसर, गोविंद कारे, पांडुरंग बोंडगे, शिवाजी बोंडगे, मीनाक्षी कुनाळे आदि पालकांनी सहभाग नोंदवला. दरम्यान जागतिक वन्य जीव दिन साजरा करताना वन्य प्राण्यांचे पर्यावरण संतुलन हा कार्यक्रम झाला. यामध्ये सहभाग, नामशेष होत चाललेले विविध वन्य प्राणी व त्यांच्या संरक्षणाची भावी नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची जबाबदारी, कोणत्याही प्राण्यांना विनाकारण त्रास देणार नाही, कोणत्याही प्राण्यांची शिकार करणार नाही, त्यांच्या संरक्षणाची पूर्णपणे जबाबदारी वैयक्तिक आमची सर्वांची असेल अशा पद्धतीची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. अजित साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक धनराज पाटील यांनी सर्व उपस्थित व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.