आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात उपजिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांच्या सूचनेनुसार जन औषधी दिवस सात मार्च निमित्ताने सोमवारी (६) उच्च रक्तदाब व मधुमेह मोफत औषधोपचार वैद्यकीय अधिक्षक डॉ विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनखाली घेण्यात आला. जन औषधी दिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांना उपचाराचे पालन करणे व फायदे यावर सामुदायिक समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.
वैद्यकिय अधीक्षक डॉ जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण जगताप, डॉ जगन्नाथ कुलकर्णी यांच्या मार्फत रुग्णांना मोफत गोळ्या वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ जाधव म्हणाले की, मधुमेह, रक्तदाबाशी संबंधित समस्या यासारख्या आजारांनी पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही व्याधी आयुष्यभर सोबत राहतात. प्रत्येकी तीन नागरिकांपैकी एक जण उच्च रक्तदाबाच्या समस्येशी झुंजत असल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत उच्च रक्तदाब हा फक्त वृद्ध नागरिकांनाचा आजार समजला जायचा. आता मात्र, २० ते २२ वर्षांचे युवक सुद्धा उच्च रक्तदाबाने पीडित असल्याचे दिसून येते. रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून शरीरातील विविध अवयवांना रक्तपुरवठा होत असतो. रक्तवाहिन्यांमधून ज्या गतीने रक्त वाहते त्याला रक्तदाब म्हणतात. सुदृढ व्यक्तीच्या शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग १२०/८० असा असतो तर १२०/८० ते १३९/८९ हा रक्ताभिसरणाचा वेग सामान्य समजला जातो.
व्यक्तिपरत्वे रक्तदाबाची सामान्य स्थिती वेगवेगळी राहू शकते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होण्यापूर्वी काळजी घेतली तर अनेक समस्या टळू शकतात. दैनंदिन जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल केले तर रक्तदाब अन त्यापासून निर्माण होणाऱ्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. असे सांगितले. जेनेरिक मेडिकल दिवस महत्त्व सांगून रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सर्वांची रुग्णालयात भेटणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी दोनशेहून अधिक रुग्ण सहभागी झाले होते. यावेळी डॉ इनामदार, डॉ संतोष कांबळे, समुपदेशक पूजा बायस, अधिपरिचारीका राखीताई वाले, परिसेविका अफसर तांबोळी,सुभद्रा गाढवेसह उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.