आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या स्वातंत्र्याचा व बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सव बुधवारपासून सुरू होत आहे.आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान महोत्सव होईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. शेतकरी बांधवांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, अशी माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपसभापती झुंबर जाधव, संचालक रावसाहेब मनगिरे, अरुण येळे, राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत मांजरे, अण्णासाहेब कोंढारे, वासुदेव गायकवाड, सचिव तुकाराम जगदाळे यांच्यासह संचालक, व्यापारी सचिन मडके उपस्थित होते.
सभापती राऊत म्हणाले, या कृषी महोत्सवातील २६० स्टॉलचे आजपर्यंत बुकिंग झाले आहे. यामध्ये उद्योग समूह, शेती औजारे, बी बियाणे, लागवड साहित्य, शेती औषधे, ग्रीन हाऊस आणि साहित्य, जैवतंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुटपालन, हॉर्टीकल्चर, सिंचन यंत्रणा, पशुधन विकास, सौर ऊर्जा, जल व्यवस्थापन, शेतमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपरिक ऊर्जा, संरक्षित शेती, पणन व विपणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, शेतविमा व अर्थसहाय्य, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉंलॉजी, ऊती तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी याच्या आस्थापना व कंपन्यांचा यात प्रामुख्याने सहभाग आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून या महोत्सवात प्रामुख्याने शेती व शेतीपूरक उदयोग, शेतमाल प्रक्रिया उद्योग यांचे स्टॉल आहेत. या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश असून सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले असणार आहे.बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे म्हणाले, ज्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीस सर्वाधिक सेस भरला आहे अशा बार्शी व वैराग येथील व्यापाऱ्यांचा, हमाल, तोलार यांचा व प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.