आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती स्पर्धेचे आयोजन‎:उमरगा जिल्हा परिषद प्रशालेमध्ये‎ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन‎

उमरगा‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा परिषद प्रशाला‎ येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ‎तालुक्यातील विविध शाळेतील १४,‎ १७ व १९ वयोगटातील व वजन‎ गटातील मुला-मुलींनी सहभाग ‎ ‎ नोंदविला होता.‎ या कुस्ती स्पर्धेत १४ वर्षे‎ वयोगटात विविध वजन गटामधून‎ किशोर हक्के, शिवशंकर‎ बिराजदार, शिवाजी मंडले, समर्थ‎ दूधभाते. १७ वर्षे वयोगटात वीरेंद्र‎ बिराजदार, शिवशंकर वासुदेव,‎ पंकज मुळजे, आकाश चोपडे,‎ प्रदीप यंपाळे, आदित्य मारेकर तर १९‎ वर्षे वयोगटात संकेत बिराजदार याने‎ यश संपादन केले.

मुलींच्या कुस्ती‎ स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून श्रावणी‎ मुळजे, साक्षी दूधभाते. १७ वर्षे‎ वयोगटात सोनाली होगाडे, गायत्री‎ कुकरडे तर १९ वर्षे वयोगटात‎ अंबिका कलमुळे, नेहा दुधनाळे या‎ मुलींनी यश मिळवले. या स्पर्धेत पंच‎ म्हणून पंचप्रमुख तानाजी मोहिते,‎ अविनाश पाटील, संतोष जाधव,‎ विश्वजीत दुबे यांनी काम पाहिले.‎ तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेस‎ मुख्याध्यापक पद्माकर मोरे, तालुका‎ संयोजक राजू सोलंकर, बाबुराव‎ पवार, क्रीडा शिक्षक बाबासाहेब‎ जाधव उपस्थित होते.‎‎

बातम्या आणखी आहेत...