आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:9 तारखेपर्यंत मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प झाला. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी मतदारांचा नोंदणी कार्यक्रम जाहीर केला असून या अंतर्गत ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे दिनांक २ डिसेंबर २२ रोजी विशेष मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आले होते. कळंब तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव मतदारांची नोंदणी बाबत १डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अंतर्गत तहसीलदार मुस्तफा खोंदे, नायब तहसीलदार निवडणूक विभागाचे श्रीकिशन सांगळे नायब यांचे मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे मतदार नोंदणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मतदार नोंदणी व मतदान करणे याबाबत नव मतदारांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉक्टर सुनील पवार, हनुमंत जाधव, शेख साजिद, अरविंद शिंदे, रमेश भालेकर यांची उपस्थित होते.या कॅम्पच्या यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी शिक्षण तथा स्वीप पथक प्रमुख सुशील फुलारी, खलील शेख, शंकर पाचभाई, प्रशांत घुटे, दीपक चाळक अशोक डिकले, प्रशांत सलगरे हरिश्चंद्र नथाडे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...