आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उस्मानाबाद येथील जिल्हा कौशल्य उद्योग विकास येथील सहाय्यक आयुक्त संजय गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. याप्रसंगी ते म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने नोकरीच्या मागे न पडता नोकरी देणाऱ्यामध्ये जाऊन बसावे.
कारण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागते आणि स्पर्धा परीक्षेचे स्वरूप हे दिवसेंदिवस बदलत चाललेले आहे. कठीण होत चालले आहे.त्यामुळे कमी वयामध्ये आपण आपले स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. तरच पुढील आयुष्यात याचा तरूणांना फायदा होऊ शकतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.सुप्रिया शेट्टी यांनी केले, प्रास्ताविक प्रा. बालाजी नगरे यांनी केले,तर आभार डॉ. अवधूत नवले यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.