आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव सोहळा संपन्न:तुळजापुरात 11 रोजी अड्डपालखीचे आयोजन

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काशीपीठाचे नूतन जगदगुरू श्री श्री श्री १००८ डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांची ११ सप्टेंबर रोजी भव्य मिरवणूक (अड्डपालखी) व गौरव सोहळ्याचे तुळजापुरात आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव जंगम मठ व लिंगायत समाजाच्या वतीने शिवपार्वती मंगल कार्यालयात सत्कारसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता काशी जगदगुरू यांचे वीरशैव जंगम मठात आगमन होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची मिरवणूक (अड्डपालखी) निघणार आहे. तर दुपारी १ वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय येथे गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात मंगेश चिवटे, प्रथमेश हंगरगेकर, सुवर्णा मुंडे यांचा विशेष सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाचा तयारी साठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आल्या ची माहिती गुरूनाथ बडुरे यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल मस्के, अॅड. गिरीश शेटे, महाबळेश्वर तोडकरी, विश्वनाथ शेटे, श्रीकांत टाकणे, अॅड.अजंली साबळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...