आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळाव्याचे आयोजन:मलंग विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्त्व कळावे म्हणून शहरातील शरणप्पा मलंग विद्यालय येथे खरी कमाई आनंद मेळाव्याचे बुधवारी (२१) आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातून व्यावसायिक ज्ञान आत्मसात केले.आनंद मेळाव्याचे डॉ अभय शिंदे यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ऑर्थोपेडिक डॉ पंडित बुटुकुणे, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन संचालक प्रवीण माशाळकर, संजय मलंग, मुख्याध्यापक अजित गोबारे आदी उपस्थित होते.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतःचे कल्पनेतून ७० खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते, त्यानंतर गमंतीदार खेळ खेळत विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आनंद मेळाव्याचा आनंद घेतला. यावेळी मुख्याध्यापक गोबारे म्हणाले, कोणते ही काम श्रेष्ठ/कनिष्ठ नसते, तत्त्वाची रुजवणूक विद्यार्थ्यांत व्हावी म्हणून खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुलांना आर्थिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान, सामाजिक ज्ञान प्राप्त होते असे मत व्यक्त केले.

विद्यालयाचे परिसरात दिवसभर चाललेल्या आनंद मेळाव्यात मुलांनी घरगुती वस्तू विविध खाद्यपदार्थाचे स्वीट कॉर्नर, वडापाव, भाजीपाला, फळे यासह विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आली होती. आनंद मेळाव्यात उपस्थित लोकांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याची खरेदी केली.

बातम्या आणखी आहेत...