आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने आयोजन, 38 जणांचे रक्तदान

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेंबळी येथील ग्रामसेवा समूहाचे दिवंगत सदस्य पत्रकार सचिन व्हनसनाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामसेवा समूहातील सदस्य, मित्रमंडळींनी रक्तदान करून श्रध्दांजली अर्पण केली. ३८ जणांनी रक्तदान केले.

बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी सचिन व्हनसनाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामसेवा समूहाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. व्हनसनाळे यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रध्दांजली अर्पण करून शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी ग्रामसेवा समूहाचे शहानवाज शेख, प्रा. धनंजय भोसले, चंदन भडंगे, शासकीय रक्तपेढीचे कर्मचारी महिपाल खाडप, विठ्ठल कांबळे, विनय कुंभार, नीता दांडेगावकर, भारत नागरसोगे उपस्थित होते.

शिबिरात युवराज निकम, सचिन मोटे, प्रमोद वाघे, केशव नळेगावकर, रोहित निकम, अ‍ॅड. अमोल गाडे, गणेश बनसोडे, नागेश सोनटक्के, अक्षय नळेगावकर, प्रदीप खापरे, रवी काशीद, नागेश शहा, प्रल्हाद चौधरी, राहुल मुंगळे, चैतन्य नळेगावकर, प्रा. धनंजय भोसले, आकाश पाटील, योगेश ढोबळे, अजय परदेशी, शरद घोडके, अर्जून बिराजदार, विष्णू बागल, सागर खापरे, शुभम चव्हाण, सूरज तांबे, महेश सौदागर, हर्षवर्धन पाटील, रंगनाथ गुंड, नारायण मुळे, ऋषिकेश व्हनसनाळे, प्रशांत कदम, राहुल गिरवलकर, महेश सोनटक्के, दत्तात्रय ढाळे, अक्षय घाडगे, केशव माळी, विलास देडेकर आदी ३८ जणांनी रक्तदान करून सचिन व्हनसनाळे यांना अभिवादन केले. श्रेष्ठदानातून आदर्श तरुणाईने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आदर्श घातला.

बातम्या आणखी आहेत...