आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचे महत्त्व:सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ चे उत्साहात आयोजन

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये ग्रीन डे विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी झाड, विविध फळे यांच्या वेशभूषा साकारल्या. ग्रीन डे च्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आपापल्या रोपट्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.

या कार्यक्रमासाठी पी. एस. आय. अनघा घोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्याना वृक्ष संवर्धन ही काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका आशा इंगळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सहशिक्षिका गौरी टकले यांनी विद्यार्थ्यांना ग्रीन डे साजरा करण्यामागचे कारण समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भोयटे यांनी केले तर आभार यास्मिन शेख यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...