आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा प्यारा:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा जनजागरण रॅलीचे आयोजन

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला देश विविध क्षेत्रांत आजही नेत्रदीपक प्रगती करत आहे. गेल्या ७५ वर्षांत देशाने केलेला प्रवास हा जगभरात उल्लेखनीय असा आहे. येणाऱ्या २५ वर्षांमध्ये देश विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. आझादी का अमृतमहोत्सव साजरा करताना हर घर तिरंगा अभियानातून प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल, असा विश्वास ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत महाजन यांनी व्यक्त केला. फेरी समारोपाप्रसंगी डॉ. महाजन बोलत होते.

शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयात आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने घरोघरी तिरंगा प्रचार व प्रसार यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. फेरीत मुख्याध्यापक नेताजी गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक सुनील बटगिरे, राजेंद्र कुलकर्णी, योगेश हासोरीकर, सुरेखा नारायणकर, रूपाली वेदपाठक, ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थ्यांच्या समवेत ढोल वाजवत शाळेपासून पतंगे रोड, मुन्शी प्लॉट, एकोंडी रोड ते प्रतिभा नगर ते महात्मा बसेश्वर विद्यालय पर्यंत प्रभात फेरी काढून घोषणा देण्यात आल्या.

त्यानंतर विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक नेताजी गायकवाड, शिक्षक माधव माने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची भाषण झाली. यासाठी संजय कोथळीकर, आर. डी. पोतदार यांसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

एकुरगा शिवशक्ती विद्यालय
श्री शिवशक्ती विद्यालयात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरे केले. हर घर तिरंगा जनजागरण फेरीची सुरुवात भारत माता पूजन करून झाली. प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अन लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी केली. ज्ञान विकास शिक्षण संस्था अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे व राजेंद्र सगर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तुळजापुरात ८ हजार घरांसाठी नियोजन
तुळजापूर नगर पालिकेच्या वतीने हर घर झेंडा अंतर्गत ३४ महिला बचत गटा मार्फत शहरातील ८ हजार घरामध्ये ध्वज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत शहरात हर घर झेंडा ही मोहीम राबवण्यात येणार आहे. हर घर झेंडा मोहीमेच्या तयारी साठी आयोजित महिला बचत गट बैठकीला मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, रणजीत कांबळे, महजबीन शेख, जयजयराम माने आदींची उपस्थिती होती. शहरात दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील ८ हजार घरी ध्वज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांना आवश्यक ती मदतीची जबाबदारी प्रमुख महेजबीन शेख यांच्याकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...