आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत व्यक्त:व्यंकटेश महाजन महाविद्यालयात  व्याख्यानमालेचे आयोजन

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ३ दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठातील प्रा.डॉ.भगवान आदटराव यांनी 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवक ' या विषयावर आपले मत मांडले.

दुसऱ्या दिवशी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य प्रा.डॉ.अनार साळुंके यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजी लेखकांचे योगदान या विषयावर आपले मत मांडले.तिसऱ्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.प्रशांत चौधरी यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय जोशी यांनी केले. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...