आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या शोधाद्वारे जगाचे चित्र बदलणारा शोध प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ सी. वी. रमण यांनी लावला. या शोधाची दखल जगाला घेणे भाग पडले. संपूर्ण भारतीयांमधून सर्वप्रथम नोबेल पुरस्कार मिळवणारा हा शोध आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने जी -२० प्रेसिडेन्सी ऑफ इंडिया या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्थापत्य अभियांत्रिकी आणि सेसा (सिविल इंजिनिअरिंग स्टुडन्ट असोसिएशन )यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून अर्थ सायन्स २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विज्ञानाची महती विद्यार्थ्यांमध्ये वाढावी, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने प्रा.एस.बी.सुरवसे, गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचे प्रा.एस.बी.कोठमाळे , प्रा. गव्हाणे, प्रा. फडतरे प्रा. आर.ए. पंखे ,उपप्राचार्य एम.डी पाटील, डीन अकॅडमिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते यांची प्रमुख उपस्थिती होती . पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये अनेक नवनवीन संकल्पना मांडल्या गेल्या. यामधूनच प्रथम पारितोषिक शिवानी महानोर आणि तिच्या संघाला मिळाले.द्वितीय पारितोषक भोरे प्रज्ञा आणि संघ तर ज्ञानदा कुलकर्णी आणि संघ तृतीय क्रमांकाच्या विजेता ठरला. यावेळी शिक्षकव शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.