आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ हे अनेक आजार आणि विकारांपासून दूर ठेवतात:आदर्श विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आदर्श विद्यालयात सोमवारी राष्ट्रीय क्रीडादिन झाला. भारताला ऑलिम्पिकमध्ये तीनदा सुवर्णपदक मिळवून देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचवणारे हॉकी जादूगर मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेचे पुजन प्राचार्य सोमशंकर महाजन, क्रीडा शिक्षिका सुनिता बारसकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आदर्श प्राथमिक विभाग मुख्याध्यापक शिवराज औसेकर, पर्यवेक्षक बी. एम. पाटील आदी उपस्थित होते.यावेळी क्रीडा शिक्षिका बारसकर, शिवराज सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. बारसकर बोलताना म्हणाल्या की,खेळ व खेळाडूंचा सहभाग पाहता चिंतनाची गरज आहे. विद्यार्थी व पालकही टक्केवारी कसे वाढतील हे पाहण्यात गुंतल्याने मुलांचे खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शाळा व महाविद्यालयातील खेळाची मैदाने ओस पडत आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्यावर परिणाम म्हणून मुलांमध्ये लठ्ठपणा, संधिवात, हृदयविकार, मधुमेह, चक्कर येणे, डोळयांना चष्मा, अशक्तपणा आदी आजाराची संख्या वाढत आहे. खेळ हे अनेक आजार आणि विकारांपासून दूर ठेवतात. निरोगी शरीरात निरोगी मन आणि बुद्धीचा विकास होतो असे सांगितले.

प्राचार्य महाजन म्हणाले की खेळामुळे केवळ आरोग्यच चांगले रहाते असे नाही. आपला परंपरांचा सन्मानही होतो. आपआपसात बंधूभाव, एकात्मता, मैत्रीची भावना वाढून माणूस धैर्यवान व चारित्र्यवान बनतो. जीवनात सुखांचा आनंद व स्वाद घ्यावयाचा असल्यास खेळा व चांगले आरोग्य, चांगले शरीर निर्माण करा असे सांगितले. कब्बडी, खो-खो, भालाफेक, गोळाफेक विविध खेळ घेऊन क्रिडा दिन साजरा करण्यात आला. यासाठी शिक्षक सैपन शेख, श्रीपाद कुलकर्णी, परमेश्वर भुजबळ, दयानंद उमाटे, निलीमा कुलकर्णी, बेबीसरोजा स्वामी,सुवर्णा चौधरी यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. सहशिक्षिका निर्मला चिकुंद्रे यांनी सुत्रसंचलन केले. शिवराज सुरवसे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...