आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण नियंत्रण व मृदा दिनाचे औचित्य:महाजन काॅलेजमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने पोस्टर प्रेझेंेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, जागतिक मृदा दिवस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन याचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत चौधरी व आर. बी. अट्टल महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मधुकर वाडीकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये विविध विषय विद्यार्थ्यांनी हाताळत आपल्या पोस्टरचे प्रेझेंटेशन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. अनिता लिंगे व प्रा. अभय शिंदे यांनी परिश्रम घेतले. या पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदूषण जनजागृती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...