आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब येथे राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा चे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. कळंब मध्ये चौथ्यांदा राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा होत आहेत. सायंकाळी ५ वाजता कळंब येथील तालुका क्रीडा संकुल येथे उद्घाटन समारंभ होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद््घाटक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत असणार आहेत. प्रमुख पाहुणे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, कळंब प्रभारी उपविभागीय अधिकारी नरसिंग जाधव, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभागाचे सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव दिपक कविश्वर, तहसीलदार मनिषा मेने, श्री शिवछत्रपती राज्य पुरस्कारार्थी गंगासागर शिंदे, अर्जुन पुरस्कारार्थी तथा तालुका क्रीडा अधिकारी, सारिका काळे, नगर परिषद मुख्याधिकारी शैला डाके, यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
मराठी मातीतला मध्ययुगीन शिवकालीन इतिहास असलेला महाराष्ट्राच्या अनेक खेड्यामध्ये खेळला जाणारा सूर पाटी नावाने ओळखला जाणारा आटपाट्या हा खेळ भारतीय आट्यापाट्या महासंघाच्या माध्यमातून नवीन नियमानद्वारे १९८६ पासून महाराष्ट्र व देशातील २२ पेक्षा जास्त राज्यांमध्ये खेळला जातो. या खेळाच्या अधिकृत संघटनेमार्फत राज्य , राष्ट्रीय व दक्षिण आशियाई स्पर्धा ही दरवर्षी पार पडतात. गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय क्रीडा व युवक सेवा संचलनाच्या माध्यमातून अधिकृतपणे या शालेय स्पर्धा घेण्यास सुरुवात केली आहे भसरतीय खेळांना प्राधान्य देण्यासाठी या स्पर्धा आयाेजित केल्या जातात.
मुंबई , पुणे , कोल्हापूर,लातूर , नाशिक, औरंगाबाद '' अमरावती , नागपूर या आठ विभागातून ३६ जिल्ह्य़ातील एकून संघ ४८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये खेळाडू ५७६ असणार आहेत, संघ व्यवस्थापक ४८, मार्गदर्शक ४८, पंच ३०,अधिकारी १०, स्वयं सेवक ५० पेक्षा जास्त असणार आहेत.कळंब तालुक्यातील ही पाचवी स्पर्धा आहे, यापूर्वी २०१४ मध्ये विद्याभवन हायस्कूल, सन २०१६ मध्ये जवळा (खुर्द) येथे, सन २०१९ मध्ये रणसम्राट महाविद्यालय येथे झाल्या. आणि यंदाच्या वर्षी तालुका क्रीडा संकुल कळंब येथे होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.