आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:एकुरगा येथील शिवशक्ती विद्यालयात शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन

उमरगा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एकुरगा येथील शिवशक्ती विद्यालयामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक मेळावा गुरुवारी दि.२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कुंभार उपस्थित होते. या सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक गोष्टीवर चर्चा झाली.

यात ज्यादा तासिका, स्कॉलरशिप, एन एम एम एस, तालुकास्तरीय खेळ व सहभाग, एलिमेंट्री- इंटरमीडिएट परीक्षा, एस एस सी सराव व बोर्ड परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा व विद्यार्थ्यांनी घेतलेले गुण, शालेय पोषण आहार, शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारच्या शालेय परीक्षा, गुणवत्ता, गृहकार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या समस्या व त्याचे निराकरण, आरोग्य व स्वच्छता, विविध स्पर्धा परीक्षा, अनुपस्थिती, रात्र अभ्यासिका आदि विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे यांनी गृह कार्य, अभ्यास, सराव ,आरोग्य व स्वच्छता, उपस्थिती, छंद, मैदानी खेळांचा सराव, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग आदि विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी , पालक उपस्थित होते. विविध शाळांमध्ये पालक शिक्षक संयुक्त बैठकांचे आयोजन होते. यातून मुलाला बरोबर मार्गदर्शन मिळते तसेच त्यांच्या विविध गुणांना प्रोत्साहन मिळते. पुढील काळात त्यांच्या करिअरबाबतही सकारात्मक चर्चा करता येते.

बातम्या आणखी आहेत...