आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:वीरमाता, वीरपत्नी यांच्या सन्मान सोहळयाचे आयोजन

उमरगा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत कठीण काळामध्ये ही देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. माजी सैनिकांना विविध प्रश्नांसाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे. माजी सैनिक संघटनेच्यावतीने माजी सैनिक वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान करण्यात येतोय कौतुकास्पद बाब असल्याचे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भारतीय माजी सैनिक संघटनेच्यावतीने शहरातील शांताई मंगल कार्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि २०) सकाळी अकरा वाजता वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळ्याप्रसंगी खासदार निंबाळकर बोलत होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अमर जवान स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी नौसेना मेडल विजेता कमांडर पूर्णा दास, माजी सैनिक संघटना तुळजापूर अध्यक्ष तानाजी जाधव, भुमचे अध्यक्ष किसन चौधरी, वाशी अध्यक्ष चंद्रकांत वीर, लोहारा अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, कळंब अध्यक्ष सोनाजी राजे यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी कमांडर दास म्हणाले की, माजीसैनिकांनी सामाजातील लोकसमुहाशी आपुलकी जपत नाते निर्माण करुन संवाद साधला पाहिजे. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत-घेत स्वतःचे कुटूंब तंदुरुस्त राहीले पाहिजे. आपले कुटूंब आर्थिकदृष्टया स्वावलंबी होणार नाही तो पर्यंत माजी सैनिकांचा विकास अशक्य आहे.

आमदार चौगुले यांनी माजी सैनिक संघटनेच्यावतीने सातत्याने घेतले जात असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उमरगा- लोहारा तालुक्यातील १२४ वीरमाता, वीरपत्नी यांचा साडी चोळी देवून सन्मान करण्यात आला. भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्य संचालक शहाजी चालुक्य यांनी प्रास्ताविक केले. यासाठी सचिव सावित्रा पतंगे, प्रकाश रणखांब, राजेंद्र बेंडकाळे, बब्रुवान गायकवाड, अदिनाथ घोरफडे, विश्वंभर दासमे, अशोक सुर्यवंशी, काशीनाथ चौधरी, गोविंद काळे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...