आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:व्यवस्थापन शास्त्र विभागात नव्या उपक्रमाचे आयोजन

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत कोव्हीड काळातील शैक्षणिक पोकळी भरून काढण्यासाठी ब्रिज कोर्स चे आयोजन केले गेले होते. या मध्ये मागील वर्षातील अभ्यासक्रम पुन्हा एकदा या कोर्सच्या माध्यमातून घेण्यात आला. यासाठी विभागातील दैनंदिन शिक्षणाव्यतिरिक्त अधिकचे नियोजन केले गेले होते.

४१ विद्यार्थांनी या कोर्समध्ये सहभाग नोंदवला. दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी विभागातील नवीन विद्यार्थ्यासाठी अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ब्रिज कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा साठी भारती विद्यापीठ, सोलापूर येथील संचालक डॉ. एस. बी. सावंत उदघाटक तर डॉ. प्रीतम कोठारी, पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांनी व्यवस्थापन कौशल्य याची गरज आणि उपलब्ध संधीसाठी कशी तयारी करावी हे स्पष्ट केले. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी विभागाचे नवनवीन उपक्रम व विभागाचे कार्य मांडले. कार्यक्रमाचे समन्वयक सचिन बस्सैये यांनी सूत्र संचालन केले.

अभिमुखता कार्यक्रमाच्या दुसऱ्या तांत्रिक सत्रात विविध विषया वरती मार्गदर्शन करण्यात आले. वरूण कळसे यांनी नियमावली व कागदपत्रे, सचिन बस्सैये यांनी शैक्षणिक मार्गदर्शन आणि डॉ. विक्रम शिंदे यांनी परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित विभागाच्या शिक्षकांनी आपले शैक्षणिक नियोजन विद्यार्थ्यासमोर मांडले. यामध्ये शीतलनाथ एखंडे, शरद गिलबिले, शरद सावंत, रितेश घोलप, सुप्रिया सुकाळे, युगंधरा कामखेडकर, अश्विनी भोसले, आरती माळी यांचा सहभाग होता. सदर कार्यक्रम हा कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, उपपरिसर संचालक प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बस्सैये व रितेश घोलप आणि आभार डॉ. विक्रम शिंदे व युगंधरा कामखेडकर यांनी मानले. या कार्यक्रमास विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...