आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपण करुन ती झाडे जगवली पाहिजेत तरच निसर्गाचे संतुलन योग्य राहिल असे, मत प्राचार्य डॉ.जी. एच जाधव यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी दि. ६ रोजी आयोजित रॅलीमध्ये ते बोलत होते.शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने सोमवारी दि.६ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त शहरातील प्रमुख रस्त्याने ऱॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव यांनी रैलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. त्यावेळी ते बोलत होते . पुढे बोलताना डॉ.जाधव म्हणाले की , खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले आहे. एका व्यक्तीने किमान पाच झाडे लावून जगवली पाहिजे. प्लास्टिकचा वापर , रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे . अतिपूर , कोरडा दुष्काळ सारख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी वृक्षसंवर्धन गरजेचे असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालय परिसर स्वच्छता करून, रॅली उमरगा शहरातील बस स्टँड, महादेव गल्ली, शिवाजी चौक या मार्गाने काढण्यात आली. समाजामध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी, पर्यावरणाचे महत्व लोकांना समजावे यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूत्रसंचलन प्रिया कांबळे आभार मनोज जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. व्ही. एस. इंगळे, डॉ. संजय अस्वले, डॉ. डी. व्ही. थोरे डॉ. एस. पी. इंगळे, प्रा. अनिल चव्हाण, डॉ. पी. डी. पाटील,नितीन कोराळे एनसीसी प्रमुख कॅप्टन प्रा. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी , कॅडेट्स उपस्थित होते.
नळदुर्ग। एस.बी.आय फाउंडेशन, मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद त्यांच्या समन्वयातून ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गायरान तांडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फळे, फुले, वनीकरणाची झाडे लावण्याचा संकल्प करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी येडोळाचे सरपंच पद्माकर पाटील, उपसरपंच लक्ष्मी जाधव, राजेंद्र जाधव, दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, भूषण पवार, गुरुदेव राठोड, अमोल पवार, अजित पवार, अविनाश पवार, सचिन पवार, राजकुमार राठोड, विठ्ठल जाधव, उमेश पवार शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.