आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयोजन‎:7 फेब्रुवारी रोजी युवक कॉंग्रेसचे‎ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन‎

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांना‎ एकत्रित करण्यासाठी माझा गाव माझी शाखा'' उपक्रम‎ राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग‎ म्हणून जिल्ह्यातील साडेतीनशे शाखाध्यक्ष व‎ उपाध्यक्ष व शाखा कमिटी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण‎ शिबीर मंगळवार दि.७ रोजी आदर्श महाविद्यालयाच्या‎ प्रांगणात येथे होणार आहे. युवक पदाधिकाऱ्यांना‎ माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल चाकुरकर ,‎ राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रभारी कृष्णा अल्लवारू,‎ राष्ट्रीय अध्यक्ष बी.श्रीनिवास मार्गदर्शन करणार‎ आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात युवक काँग्रेसचे संघटन‎ मजबूत करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात‎ येत आहे . राज्यात २६०० शाखांची स्थापना झाली‎ आहे. त्यासोबतच पक्ष संघटनेचे काम गावपातळीवर‎ पोहचावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने माझे‎ गाव माझी शाखा हा उपक्रम राबवून राज्यभर शाखा‎ उभारणीचे काम चालू केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...