आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा सहभाग:उमरग्यात एड्सबाबत जनजागृती फेरीचे आयोजन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, रोटरी क्लब, समाज विकास संस्था व स्वयंसेवी संघटनाच्यावतीने एड्स कॅम्पिंगच्या माध्यमातून गुरूवारी (१) शहरातून महा जनजागृती फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर अतिरिक्त जिल्हासत्र न्यायाधीश डी. के. अनुभले यांचे हस्ते महाफेरीचे उद्घाटन झाले. यावेळी तहसीलदार प्रसाद चौगुले,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद जाधव, पोलिस निरीक्षक मनोज राठोड, समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ, निखिल वाघ, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. धनाजी थोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद देवरकर, प्रा. डॉ. जी. एन. सोमवंशी, डॉ. पार्वती सावंत, प्रा. सुरज सुर्यवंशी, समुपदेशक अभय भालेराव, समाज विकास संस्थेचे विद्याताई मारकड, रोहित पवार, दिनेश बिराजदार,कृष्णा पाटील,प्रशांत ढवळे, संकेत लवके आदींची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून हुतात्मा स्मृती उद्यानापर्यंत काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत छत्रपती शिवाजी महाविद्यालय, तात्यारावजी मोरे फार्मसी कॉलेज, शिवाई फॉर्मसी कॉलेज व साई एएनएम कॉलेजचे विद्यार्थी, संस्था प्रतिनिधी, रिक्षा युनियनचे पदाधिकारी शहरातील युवकांनी सहभाग घेतला होता. या फेरीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी एडसग्रस्ताची तिरडी घेवून फेरीत सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...