आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाणथळ’ जागांमुळेच शेती, पशुपालन, मत्स्यपालन व इतर शेतीपूरक व्यवसायांची भरभराट झाली आहे. पाण्याचे नैसर्गिकरित्या शुध्दीकरण करणे, पाण्याची गुणवत्ता शुद्ध राखणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे, जमिनी ची सुपीकता वाढविणे, नैसर्गिकरित्या शेतजमिनीत सेंद्रीय घटकांचे संतुलन राखणे असे फायदे यामुळे होतात असे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे यांनी केले. तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयामध्ये गुरूवारी (०२) जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनसेवक व्यंकटराव पाटील, दयानंद करके, विष्णू कांबळे उपस्थित होते.ते पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस दरवर्षी दोन फेब्रुवारीला सर्वत्र साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्या मागचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये पाणथळ प्रदेशांची पृथ्वीसाठी महत्त्वाची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करणे. सर्वसामान्यांना निसर्गासाठी पाणथळ प्रदेशाचे महत्त्व ओळखण्यासाठी संधी देणे म्हणून हा दिवस विद्यालयात पाणथळ दिन साजरा करण्यात आला. वनसेवक व्यंकट पाटील, दयानंद करके, विष्णू कांबळे यांने विद्यालय परिसरातील वृक्षांवर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या वाट्यामध्ये पाणी भरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.