आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनात यश संपादन करण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागत असतात, त्यात महिला म्हटले की, अनेक अडचणी समोर उभ्या असतात. अशातून ही रुग्ण सेवा देत सामाजिक बांधिलकीतून गरीब, गरजू आणि एकल विधवा महिलांना मदतीचा हात देवून महिला अबला नसून सबला असल्याचे दाखवून देत डॉ. ॲड. कुंती जाधव शहर व ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रमातून प्रयत्न करीत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागातील महिलांसाठी शनिवारी (११) गर्भ संस्कार शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी डॉ भारती देसाई-मडवई, डॉ गायत्रीताई वानखेडे, लताताई हसनाळकर,शोभा राजूरकर, नलिनीताई बिराजदार, भार्गवी दीक्षित, ज्योती वरखिंडे, रंजना मानुरे, सविता चंदूरवाड, मीराताई मोरे आदी उपस्थित होत्या.
ॲड. डॉ. कुंती जाधव प्रास्ताविकात म्हणाल्या, केवळ आपल्या स्वतःसाठी नाहीतर समाजातील गरजू, गरीब आणि विधवा महिलासाठी एक महिला म्हणून कार्य करताना समाजातील शेवटच्या घटकातील सर्वसामान्य महिलांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी सुशिक्षित महिलांनी जगले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासून स्वतःच्या कुटुंबासोबतच इतरांच्या सुख दु:खात सहभागी होवून एक आधार देण्याची गरज आहे. बाळ हे गर्भाशयात असतानाच त्यात सद्गुण, नैतिक मूल्ये व संस्कारांचे बीज रोपणे याला गर्भसंस्कार म्हणतात. आईच्या आणि बाळाच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी या मोफत गर्भ संस्कार शिबिरात सहभागी होवून संस्कारित पिढी घडवण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन केले. डॉ भारती देसाई म्हणाल्या, बाळाची मानसिकता घडविणाऱ्या मज्जासंस्थेचा पाया गर्भावस्थेतच रचला जात असतो. मुलाचे आरोग्य, वर्तन, स्वभाव आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरविणारी ही एक अत्यंत निर्णायक अवस्था असते. नऊ महिन्यांच्या काळात स्त्रीला येणाऱ्या शारीरिक, मानसिक व वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते. या समस्येवर योगसाधनेतून मात करता येईल. बाळाच्या जन्मासाठी आणि सुलभ प्रसूतीसाठी योगसाधने शिवाय पर्याय नाही. आसन प्राणायामाबरोबरच बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, स्पष्ट आवाज, तेज:पुंज क्रांतीसाठी उपयुक्त साधना याबाबत समजावून सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.